श्री गणेशाच्या प्रतिमेचे विडंबन केल्याप्रकरणी अमेरिकेतील योगा आस्थापनाकडून क्षमायाचना

विदेशातील हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कृतीशील होतात; मात्र भारतातील हिंदू निष्क्रीय रहातात !

 (हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

नेवाडा (अमेरिका) –  चार्लस्टन (दक्षिण कॅरोलिना) येथील ‘योलोहा योगा आस्थापना’ने श्री गणेशाची प्रतिमा असलेल्या ‘योगा मॅट’ (चटया) बनवल्या आहेत. त्याला हिंदूंनी विरोध केला, तसेच हिंदूंच्या देवतेचा अवमान करणार्‍या या आस्थापनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेनंतर सदर योगा आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावरून या चटयांची विक्री बंदी केली, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी क्षमायाचना केली.


Multi Language |Offline reading | PDF