कार्यालयाच्या नावाची पाटी मराठीत लावण्यासाठी मनसेची अंमलबजावणी संचालनालयाच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार 

 

मुंबई – कार्यालयाच्या नावाची पाटी मराठी भाषेत लावण्यासाठी मनसेकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयाच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे. याविषयी मनसेने ‘ट्विटर’द्वारे माहिती दिली आहे. यामध्ये ‘मराठी भाषा विभाग अंमलबजावणी संचालनालयाला मराठी भाषेत फलक लावण्याची सक्ती करणार का ?’, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. २२ ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरे यांना अन्वेषणासाठी बोलावले होते. या वेळी साडेआठ घंट्यांहून अधिककाळ राज ठाकरे यांचे अन्वेषण करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF