समाजकंटकांना पोलीस ठोकणार कि मी ठोकू ? – नितीन नांदगावकर, मनसे

मुंब्रा येथे धर्मांधांनी वाहतूक पोलिसांवर हात उगारल्याचे प्रकरण

आतापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी धर्मांधांच्या केलेल्या लांगूलचालनाचा हा परिणाम आहे. यापुढे धर्मांधांची अरेरावी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे.

मुंबई – पोलिसांच्या गणवेशाला हात लावण्याचे कोणाचे धैर्य कसे होते ? पोलिसांची भीती जर अल्प होत चालली, तर कसे चालेल ? अशा लोकांना रस्त्यात फोडून काढले पाहिजे. अशा समाजकंटकांना पोलीस ठोकणार कि मी ठोकू ? असा संतप्त प्रश्‍न मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मागील आठवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अडवले म्हणून काही धर्मांधांनी वाहतूक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. या प्रकरणी नितीन नांदगावकर यांनी ‘फेसबूक’वर एक व्हिडिओ शेअर करून त्यांची संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. (आज सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे काढण्यास पोलीस घाबरतात. मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्ते अडवून नमाजपठण केले जाते, तेही रोखण्याचे पोलिसांचे धैर्य होत नाही. त्यामुळेच आज पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत धर्मांध उद्दाम झाले आहेत. – संपादक) 

या व्हिडिओत नितीन नांदगावकर म्हणतात की, या आठवड्याभरात अशी दुसरी घटना घडली आहे. महिला पोलिसांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली जाते. पोलिसांना धक्काबुक्की केली जाते. मुंबईमध्ये पोलिसांची भीती राहिली नाही, तर गुन्हेगारांना भीती कशी बसेल ? अशा समाजकंटकांना रस्त्यात फोडून काढले पाहिजे. एका पोलिसाला मारत असतांना अन्य पोलीस केवळ ध्वनीचित्रीकरण करतात. कारवाई करण्यासाठी ध्वनीचित्रीकरण आवश्यक आहे; मात्र बघ्याची भूमिका कसली घेता ? पट्टे काढून अशा समाजकंटकांना मारले पाहिजे. आपल्या पोलिसांना मारत असतांना आजूबाजूला बघ्याची भूमिका घेणार्‍यांचाही मला राग येतो. जे पोलीस रात्रंदिवस जनतेची सेवा करतात, त्यांच्या साहाय्याला कुणीच जात नाही. त्याऐवजी छायाचित्र काढत बसतात, ही शोकांतिका आहे. अशा नागरिकांचा मला राग येतो. अशा नागरिकांना प्रथम मार दिला पाहिजे. पोलिसांवर हात उगारणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवायला हवा. कुणीही येते आणि पोलिसांना टपल्या मारून जाते. स्वत:विषयी आदर निर्माण करायला जमत नसेल, तर पोलिसांनी स्वत:विषयी गुन्हेगारांमध्ये भीती तरी निर्माण करावी. पोलिसांनी स्वत:चे मनोबल खच्चीकरण करून घेऊ नये. यापुढे कोणी पोलिसांवर हात टाकला, तर तो माझा वैयक्तिक शत्रू असेल.


Multi Language |Offline reading | PDF