काश्मीरप्रश्‍न द्विपक्षीय चर्चेतून सोडवा ! – फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ

चेन्टिली (फ्रान्स) – काश्मीरप्रश्‍न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसर्‍या देशाने हस्तक्षेप करता कामा नये, तसेच हिंसाचार होईल, अशी पावले उचलता कामा नयेत, असे विधान फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे.

सध्या फ्रान्सच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांच्यात नुकतीच भेट झाली. या वेळी त्यांनी विविध सूत्रांवर चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करतांना मॅक्रॉ यांनी वरील प्रतिपादन केले. ‘भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल विमान करारापैकी पहिले विमाने पुढील मासामध्ये भारताला देण्यात येईल’, असेही मॅक्रॉ यांनी या वेळी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF