भारताला अण्वस्त्र आक्रमणाची धमकी देणार्‍या पाकच्या मंत्र्याला लंडनमध्ये अज्ञातांनी चोपले !

पाकच्या मंत्र्यांना चोपायला अण्वस्त्रांची आणि भारतीय सैन्याचीही आवश्यकता नाही, हे पाकिस्तान्यांच्या आता लक्षात आले असेल !

लंडन – कलम ३७० रहित केल्यानंतर भारताला अण्वस्त्र आक्रमणाची धमकी देणारे पाकचे रेल्वेमंत्री आणि अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञातांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर अंडी फेकल्याची घटना घडली आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये पुरस्कार सोहळ्यामध्ये ही मारहाण झाली. सोहळ्याच्या वेळी शेख सिगरेट ओढण्यासाठी बाहेर आले असता अज्ञातांनी त्यांना मारहाण केली आणि ते पळून गेले.

१. या आक्रमणाचे दायित्व ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’शी (‘पीपीपी’शी) संबंधित नेत्यांनी घेतले आहे. ‘पीपीपी’शी संलग्न असलेल्या ‘पीपल्स युथ ऑर्गनायझेशन युरोप’ या गटाचा अध्यक्ष असणारा आसिफ अली खान आणि पक्षाच्या महिला शाखेच्या समा नमाज यांनी ‘शेख यांच्यावर आम्हीच आक्रमण केले’, असे म्हटले आहे.

२. शेख यांनी काही दिवसांपूर्वी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांच्याविषयी अपशब्द काढले होते. त्यामुळेच त्यांना मारहाण करण्यात आली. पाकिस्तानमधील महिला पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेचा सीसीटीव्हीतून मिळालेला व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF