(म्हणे) ‘आम्हाला काश्मीरमधील मुसलमानांची चिंता वाटते !’ – इराणचे ज्येष्ठ नेते अयातुल्लाह सईद अली खामेनी

खामेनी यांना मागील ३ दशकांत काश्मीरमधील हिंदूंची चिंता का वाटली नाही ? काश्मीरमधील धर्मांधांमुळे तेथील हिंदूंना पलायन करावे लागले होते, हे खामेनी का सांगत नाहीत ? काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्याविषयी इराणने बोलण्याची आवश्यकता नाही !

नवी देहली – आम्ही काश्मीरमधील मुसलमानांच्या स्थितीविषयी चिंतेत आहोत. भारतासमवेत आमचे चांगले संबंध आहेत; मात्र आम्ही भारत सरकारकडून काश्मीरच्या लोकांसमवेत न्यायपूर्ण नीती अवलंबण्यास आणि तेथील मुसलमानांवर अत्याचार अन् अन्याय न करण्याची आशा करतो, असे इराणचे ज्येष्ठ नेते अयातुल्लाह सईद अली खामेनी यांनी काश्मीरप्रश्‍नी ट्वीट करतांना म्हटले आहे.

खामेनी यांनी पुढे म्हटले की, काश्मीरमधील सध्याची स्थिती आणि भारत-पाक यांच्यातील वाद हा ब्रिटिशांच्या द्वेषपूर्ण नीतीचा परिणाम आहे, जी त्यांनी भारतीय उपखंडातून जातांना अवलंबली होती. काश्मीरमध्ये संघर्ष चालू ठेवता येईल, यासाठी ब्रिटिशांनी असे जाणीवपूर्वक केले.


Multi Language |Offline reading | PDF