घोटाळेबाज चिदंबरम् यांच्या कुटुंबियांकडे १७५ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती

अशा घोटाळेबाजांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

नवी देहली – ३०५ कोटी रुपयांच्या आयएन्एक्स मिडिया घोटाळ्यात अटक झालेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. त्यांची देश-विदेशात संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबियांनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्याकडे सध्या १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

१. चिदंबरम् आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे ९५ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम् यांच्याकडेही ८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ९ कोटी ७५ लाख रुपये आहे.

२. चिदंबरम् यांचे अन्य संस्थांमध्ये २५ कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे १३ कोटी ४७ लाख रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आहेत. त्यांच्याकडे १० लाख रुपयांचा विमा, ८५ लाखांचे दागिने आणि २७ लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये २ ठिकाणी अनुक्रमे दीड आणि ७ कोटी रुपयांच्या शेतजमिनी आणि ३२ कोटी रुपयांची घरे आहेत.

३. पी. चिदंबरम् आणि कार्ती चिदंबरम् यांच्याकडे परदेशात २५ ठिकाणी संपत्ती असल्याची माहितीही सीबीआयकडून देण्यात आली. ईडीने आतापर्यंत त्यांची ५४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत, ब्रिटन आणि स्पेन येथील संपत्तीचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF