अकलूज (सोलापूर) येथील श्री. जयंत जठार आणि श्रीमती आशा गोडसे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. जयंत जठार यांचा सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

अकलूज (जिल्हा सोलापूर), २३ ऑगस्ट (वार्ता.) – एकही क्षण वाया न घालवता सतत सेवारत रहाणारे येथील सनातनचे साधक श्री. जयंत जठार (वय ५६ वर्षे) आणि पती निधनानंतरही दु:खात आणि मायेत न अडकता १५ दिवसांतच गुरुसेवेला प्रारंभ करणार्‍या श्रीमती आशा गोडसे (वय ५८ वर्षे) यांनी ६१ टक्के पातळी गाठली. श्री. जठार यांची आनंदवार्ता सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी, तर श्रीमती गोडसे यांची आनंदवार्ता ६९ टक्के पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी दिली. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दोघांनाही परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सन्मान केला. या वेळी सभागृहात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. साधकांनी श्री. जठार आणि श्रीमती गोडसे यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

केवळ प.पू. गुरुदेवांचेच व्हावेसे वाटते ! – श्रीमती आशा गोडसे

श्रीमती आशा गोडसे यांचा सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘आता केवळ प.पू. गुरुदेवांचेच व्हावे’, असे वाटते. त्यांच्या चरणांवरचे एक फूल आहोत. त्यामुळे ‘दु:ख करत बसण्यात काहीच अर्थ नाही’, असे वाटते. मला ‘परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र हवे’, असे वाटत होते आणि पातळी घोषित झाल्यावर तेच छायाचित्र मिळाले. ‘परात्पर गुरुंनी आता असेच पुढे पुढे न्यावे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !

पत्नी सौ. उल्का जठार हिच्यामुळे मी साधनेत आलो. पत्नीला मी नियमित चुका विचारतो. सद्गुरु स्वातीताईंनी सतत मार्गदर्शन करून माझी प्रगती करून घेतली. – श्री. जयंत जठार

श्री. जयंत जठार यांच्या कुटुंबियांचे मनोगत

स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणारे श्री. जयंत जठार ! – सौ. उल्का जठार (पत्नी)

श्री. जठार यांनी मला साधनेत पुष्कळ साहाय्य केले आहे. ते आम्हाला साधनेसाठी सतत प्रोत्साहन देतात. मध्यंतरी ते स्वत: आजारी होते. त्यानंतर सून सौ. प्रियांकाही गर्भवती होती. तेव्हा ‘मी घरी रहावे’, अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नाही. ‘त्यांच्या स्वत:च्या आजारपणामुळे माझ्या साधनेत अडथळा नको’, असा त्यांचा सतत विचार असतो.

मुलीप्रमाणे प्रेम दिले ! – सौ. प्रियांका जठार (श्री. जठार यांची सून)

बाबांविषयी कितीही सांगितले, तरी ते अल्पच आहे. त्यांनी मला माहेरची उणीव कधीच भासू दिली नाही. मी सून असूनही मला मुलीप्रमाणे प्रेम दिले. माझ्याकडून काही चूक झाली, तरी त्यांनी मला न रागावता प्रेमाने समजून घेतले. बाबा पुष्कळ शांत आहेत.

वडिलांचा परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे ! – कु. पूजा जठार (मुलगी) (दूरभाषवरून)

बाबांची आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला. बाबांनी आम्हा कुटुंबियांना साधनेमध्ये सतत प्रोत्साहन दिले. त्यांचा परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्यामध्ये साधनेत चिकाटी, तळमळ, परिपूर्णता हे गुण आहेत.

महिलेपेक्षाही घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणारे श्री. जठारकाका ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

व्यष्टी साधना चांगली असल्यास आपल्यावर वाईट शक्तीचे आवरण येत नाही. त्यामुळे ईश्‍वरी गुण स्वत:मध्ये येण्यास साहाय्य होते. श्री. जठार काका यांच्या पत्नी सौ. जठार या सेवेनिमित्त माझ्यासमवेतच असतात. आम्ही त्यांच्या घरी कधीही गेलो, तरी जठारकाकांनी एका महिलेपेक्षाही घर स्वच्छ आणि नीटनेटके घर ठेवलेले असते. काका कुठेही वेळ न दवडता सेवारत रहातात.

निरपेक्ष वृत्तीचे श्री. जठारकाका ! – कु. दीपाली मतकर

कुटुंबातील सर्वच सदस्य सेवेत रहावेत, यासाठी कुटुंबातील सर्व दायित्वे पार पाडत श्री. जठारकाका नोकरी करून सतत साधनारत रहातात. कोणाकडूनही अपेक्षा न करता ते निरपेक्ष रहातात.


Multi Language |Offline reading | PDF