भडगांव गावाचा रस्ता करण्यासाठी ९ लाख रुपये संमत ! – संभाजीराव भोकरे

श्री. संभाजीराव भोकरे

कागल (जिल्हा कोल्हापूर), २३ ऑगस्ट (वार्ता.) – शिवसेना ग्रामविकास राज्यमंत्री श्री. दादासो भुसे यांच्या आर्थिक निधीतून भडगांव गावाचा रस्ता करण्यासाठी ९ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. याचसमवेत ११ गावांसाठी १ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात येणार आहे. तो संमत करण्यासाठी जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. यासाठी शिवसेना कागल तालुक्याच्या वतीने उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, सर्वश्री दिनकर जाधव, अशोक पाटील, शिवगोंड पाटील, तसेच ग्रामपंचायत भडगांव यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF