राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले संभाजीनगर येथील कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी गोरख चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन

श्री. गोरख मानसिंग चव्हाण यांना राखी बांधून त्यांचे अभिनंदन करतांना समितीची कार्यकर्ती

संभाजीनगर, २३ ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रपती पदकाने सन्मानित कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री. गोरख मानसिंग चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना राखीही बांधण्यात आली.

त्यांना नुकतेच राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक वर्षी गोपनीय अहवालात अ+ शेरा मिळवला. वर्ष २०१७ मध्ये पोलीस सन्मान मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्यांना  आतापर्यंत ४०७ पारितोषिके मिळाली आहेत.

त्यांनी संभाजीनगर येथे समाजांतर्गत शांतता, सुव्यवस्था आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी न करता अविरत परिश्रम घेतले. या उल्लेखनीय कामगिरीविषयी त्यांचा  राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला. या सर्वांचे श्रेय त्यांनी ईश्‍वराला दिले आहे. लहानपणापासून त्यांना वडिलांकडून वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात शांतता राखण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.


Multi Language |Offline reading | PDF