आसाममधून क्रिकेट खेळाडूंना धमकावणार्‍याला अटक

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) खेळाडूंना धमकावणारा मेल आसाममधील एका तरुणाने पाठवला होता. महाराष्ट्र आतंकवावादविरोधी पथकाने हा मेल पाठवणार्‍याला आसाममधील धरमतूल (मोरेगाव) येथून अटक केली आहे. ब्रजमोहन दास असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला २० ऑगस्टला अटक केल्यावर न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी तरुण मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF