देहली विश्‍वविद्यालयात काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्या विद्यार्थी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या पुतळ्याला काळे फासले

  • अशा देशद्रोही विद्यार्थी संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे आणि संबंधितांना कारागृहात डांबले पाहिजे !
  • काँग्रेस आणि कम्युनिस्ट हेच पक्ष मुळात राष्ट्रघातकी आहेत. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली. नेताजी बोस यांना देशातून पलायन करावे लागले. ‘ते परत आल्यास त्यांना विरोध करू’, असे नेहरूंनी म्हटले. भगतसिंह यांना साहाय्य करण्यास मोहनदास गांधी यांनी नकार दिला होता. कम्युनिस्टांना नेहमीच रशिया आणि चीन यांच्याविषयी निष्ठा राहिली आहे, ते नक्षलवादी आहेत. अशांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशद्रोही ठरवणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’च होत !

नवी देहली – येथील देहली विश्‍वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारला होता. दुसर्‍याच दिवशी काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’चे (‘एन्.एस्.यू.आय.’चे) देहली अध्यक्ष अक्षय लाकरा आणि या संघटनेचे कार्यकर्ते यांनी पुतळ्याला काळे फासले अन् चपलांचा हार घातला. त्याला कम्युनिस्टांची विद्यार्थी संघटना ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’नेही साहाय्य केले. अभाविपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह नेताजी बोस आणि भगतसिंह यांचेही पुतळे उभारले होते. या घटनेनंतर ‘या संघटनांवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी अभाविपने केली आहे.

एनएसयूआयने म्हटले की, अभाविपने दोन स्वातंत्र्यसैनिकांसमवेत सावरकर यांचा पुतळा उभारून स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केला आहे. सावरकर यांचा स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता. ते देशभक्त नाही, तर देशद्रोही होते. यामुळेच त्यांच्या पुतळ्याला काळे फासले.


Multi Language |Offline reading | PDF