स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तात्काळ ‘भारतरत्न’ घोषित करा !

मुंबई – काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले ! ही अतिशय संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला, तरी अल्पच आहे. हा अपमान केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा; संपूर्ण क्रांतीकारकांच्या चळवळीचा; समस्त देशप्रेमी नागरिकांचा आहे. ‘हा अक्षम्य अपराध करणारे हे देशद्रोहीच आहेत’, असे मानून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच ‘काँग्रेसच्या पापांचा घडा आता भरला आहे. येणार्‍या निवडणुकांत आता राष्ट्रभक्त जनताच काँग्रेसचा अंत करील’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

यात पुढे म्हटले आहे की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतरही १८ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत ती अशी कृती करतच आहे. आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, हा अवमान कायमचा थांबवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ घोषित करावे आणि राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची विटंबना करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा नवा कायदा बनवून देशविरोधी शक्तींवर वचक बसवावा. हीच सावरकरांना खरी मानवंदना ठरेल. येत्या काळात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जनतेने काँग्रेसी नेत्यांना सावरकरांविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगून या अवमानाविषयी जाब विचारण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF