संभाजीनगर येथे तलवारी हवेत नाचवणार्‍या २ धर्मांधांना अटक

तलवारी बाळगून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या धर्मांधांचा उच्छाद वेळीच रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !

संभाजीनगर – चारचाकी रस्त्याच्या कडेला लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत तलवारी हवेत नाचवल्याच्या प्रकरणी मोहम्मद नफीस उपाख्य सरवर मोहम्मद याकूब (वय २४ वर्षे) आणि सय्यद वाजेद उपाख्य अज्जू-वज्जू सय्यद शौकत (वय २७ वर्षे) यांना २० ऑगस्टला अटक करून न्यायालयात उपस्थित केले. त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. याच प्रकरणात यापूर्वी आरोपी शेख गफ्फार उपाख्य बबल्या शेख सत्तार याला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणी एम्आयडीसी सिडकोचे पोलीस नाईक गणपतसिंह सरदारसिंह बायस (वय ४७ वर्षे) यांनी तक्रार दिली होती.

१६ ऑगस्टच्या रात्री बायस आणि त्यांचे सहकारी पहारा घालतांना काही तरुण तलवारी घेऊन गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. घटनास्थळी गेल्यावर तरुण रस्त्याच्या कडेला चारचाकीत मोठ्या आवाजात गाणी वाजवत होते आणि चार तरुण तलवारी हवेत नाचवत होते. पोलिसांना पहाताच आरोपींनी चारचाकी सोडून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF