कन्नड (जिल्हा संभाजीनगर) येथे तिहेरी तलाकप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद

तिहेरी तलाक देणार्‍या पतीला कठोर शासन व्हायलाच हवे !

कन्नड (जिल्हा संभाजीनगर) – तिहेरी तलाकप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी शबाना बी अकील शेख (वय २६ वर्षे) या मजुरी करणार्‍या महिलेने पती अकील सुलतान शेख (काकर) आणि दीर आसिफ सुलतान शेख यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. महिलेच्या भावाच्या भ्रमणभाषवर तिच्या पतीने शिवीगाळ केली. तसेच सांभाळ न करण्याच्या उद्देशाने भ्रमणभाषवरून ‘तलाक, तलाक, तलाक’ असे तीनदा म्हणून अवैधरित्या तलाक दिला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF