बहुसंख्य हिंदूंच्या मताप्रमाणे देश चालेल ! – चंद्रकांतदादा पाटील

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे – देशात हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या मताप्रमाणे देश चालेल. तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेले नाही. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. तेही कुटुंबियांसमवेत देखावे पहायला येतात. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून मंडळांचे समाधान होईल, असा तोडगा काढू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजिनक गणपति ट्रस्टच्या वतीने आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, महापौर सौ. मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, नगरसेवक अजय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात नागरिकांना देखावे व्यस्थित पहाता यावेत, यासाठी वेळ वाढवून देण्याची आणि विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्ये वाजवू देण्याची गणेशभक्तांची मागणी आहे. यावर मी प्रशासनाशी बोलून आणि कायदेशीर अन् व्यावहारिक तोडगा काढेन.’’


Multi Language |Offline reading | PDF