पनवेलसह नवी मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वृद्धी

पनवेल – पनवेलसह नवी मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याचे वास्तव पर्यावरण अहवालातून मांडण्यात आले आहे. हा पर्यावरण अहवाल नुकताच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे.

यात म्हटले आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी ध्वनीप्रदूषणाबाबतचे नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. त्यांपैकी खारघर उत्सव चौकात सर्वांत अधिक ध्वनीप्रदूषणाची नोंद नवरात्रीत करण्यात आली होती. शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिका हद्दीतील भूमीचा वापर २४ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर गेला आहे, तर शेतभूमीचे क्षेत्र ७७.९ वरून ४६.४ टक्क्यांवर आले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण लक्षात घेता कासाडी नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

पनवेल महापालिका प्रभाग १ आणि २ येथील पाणी पिण्यायोग्य नाही

पनवेल महापालिका प्रभाग १ आणि २ हे दोन प्रभाग सर्वांत अधिक प्रदूषित प्रभाग आहेत. या ठिकाणचे पाणीही पिण्यायोग्य नाही, असेे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होते !’ – अहवालातील निष्कर्ष

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या कालावधीत नदी आणि तलाव यांमध्ये मूर्ती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी अहवालात कृत्रिम तलावांत मूर्तीविसर्जन करण्याविषयी नमूद करण्यात आले आहे. (धर्मशास्त्रविरोधी कृत्रिम तलाव नव्हे, तर शास्त्रानुसार लहान शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्यास पर्यावरणाचा र्‍हास रोखला जाऊ शकतो, याविषयी प्रशासनाने प्रबोधन करणे अभिप्रेत आहे. – संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF