भगवान श्रीरामाचे प्राचीन मंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली ! – ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता

सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीवरील नियमित सुनावणी

नवी देहली – रामजन्मभूमीवर मशीद बांधण्यात आली होती. तेथे पूर्वी भगवान श्रीरामाचे भव्य प्राचीन मंदिर होते. पुरातत्व विभागाने येथे केलेल्या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या त्यातून हे स्पष्ट झाले आहे, असा युक्तीवाद ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता वैद्यनाथन् यांनी ८ व्या दिवशीच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात केला.

वैद्यनाथन् यांनी सांगितले की,

१. अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय देतांना म्हटले आहे की, अयोध्येमध्ये भगवान रामाचे प्राचीन मंदिर पाडण्यात आले आणि तेथे मशीद बांधण्यात आली. यानंतरही हिंदूंची त्या स्थानाविषयीची श्रद्धा न्यून झाली नाही. हिंदू पूर्वीप्रमाणेच तेथे जात होते आणि पूजाअर्चा करत होते. त्यांनी कधीही पूजा करणे बंद केले नाही.

२. प्रथम मुसलमान पक्षकार मशिदीखाली मंदिर असल्याची रचना मान्य करत नव्हते. नंतर त्यांनी तेथे इस्लामी रचना असल्याचे सांगायला चालू केले. मशीद पाडल्यानंतर तेथे १२ व्या शतकातील संस्कृतमध्ये लिहिलेला एक शिलालेख सापडला होता. यावर मंदिराविषयीचा उल्लेख होता. त्या वेळी तेथे राजा गोविंदा चंद्रा राज्य करत होते आणि अयोध्या त्यांची राजधानी होती. तेव्हा तेथे विष्णु मंदिर होते. पुरातत्व तज्ञांनी ते मान्यही केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF