हिंदूंना हाकलणार्‍या पाकने काश्मीरमधील लोकसंख्या संतुलनाची चिंता करू नये ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले

डॉ. डेव्हिड फ्रॉले

नवी देहली – पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील लोकसंख्येचे संतुलन आधीच पालटले आहे. त्याने या भागामध्ये आतंकवाद्यांची संख्याही भरमसाठ वाढवली आहे. काही मोजकी उदाहरणे सोडता बहुतांश हिंदूंना त्याने हाकलूून लावले असून पाकमधील लोकसंख्येचे संतुलनही बिघडवले आहे. एवढे सगळे स्वत:च्या देशात करून आता त्याला ‘काश्मीरमधील लोकसंख्येचे संतुलन बिघडेल’, अशी चिंता लागली आहे, असे ट्वीट अमेरिकेतील तत्त्वज्ञ, विचारवंत आणि भारतातील हिंदु संस्कृतीचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले (श्री वामदेव शास्त्री) यांनी केले आहे.

‘कलम ३७० रहित करणे, हा भारताचा डाव आहे. या निर्णयाच्या माध्यमातून काश्मीरमधील लोकसंख्येचे प्रमाण पालटून हिंदूंचे प्रमाण वाढवण्याचा हा प्रयत्न आहे’, अशी टीका पाककडून करण्यात आली. या  टीकेला डॉ. फ्रॉले यांनी वरील उत्तर दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF