भारत आणि भूतान यांसारखे शेजारी देश जगात कुठेच नाहीत ! – पंतप्रधान मोदी

थिम्पू (भूतान) – भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर इतिहास, सांस्कृतिक परंपरा आदींमध्ये भारत आणि भूतान यांमधील संबंध घनिष्ठ आहेत. एकमेकांमध्ये उत्तम ताळमेळ असलेले भारत आणि भूतान यांच्यासारखे शेजारी देश जगात कुठेच नाहीत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले. पंतप्रधान मोदी सध्या भूतानच्या दौर्‍यावर आहेत. १८ ऑगस्टला ते येथील रॉयल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. त्या वेळी त्यांनी वरील उद्गार काढले. ‘सध्याच्या घडीला भारतीय विद्यापिठांमध्ये भूतानचे ४ सहस्रांंहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा वाढला पाहिजे’, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF