(म्हणे) ‘फॅसिस्ट हिंदु’ असणार्‍या भारत सरकारच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित नसल्याची जगाने नोंद घ्यावी ! – इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकमधील अण्वस्त्रेच सुरक्षित नाहीत आणि ती कधीही जिहादी आतंकवाद्यांच्या हातात जातील, अशी तेथील स्थिती आहे. जगाला याचीच भीती आहे, हे इम्रान खान यांनाही ठाऊक आहे !

इस्लामाबाद – भारतातील फॅसिस्ट, वंशवादी आणि हिंदु वर्चस्ववादी सरकारच्या कार्यकाळात तेथील अण्वस्त्रांचा साठा सुरक्षित नाही. याची आंतरराष्ट्रीय समुदायाने नोंद घ्यावी. भारताच्या अण्वस्त्रसाठ्याच्या सुरक्षेचे सूत्र गांभीर्याने विचारात घेण्याची आवश्यकता आहे. प्रादेशिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असून त्यासमवेत जागतिक शांततेसही धोका पोचू शकतो, असे ट्वीट पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. २ दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अण्वस्त्राचा प्रथम वापर न करण्याचे धोरण भारत कायम ठेवीलच असे नाही’, असे म्हटले होते. त्यावर इम्रान खान यांनी वरील विधान केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF