एस्.एम्. मुश्रीफ यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात हिंदु एकता आंदोलन पक्षाची तक्रार

या तक्रारीच्या विरोधात पोलीस प्रशासनाने काय केले ?

पुणे, १८ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र दीक्षित यांनी राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांच्या ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड, मुस्लिम्स हँग्ड’ (ब्राह्मणांनी बॉम्बस्फोट घडवले आणि मुस्लीम लटकले) या पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या पुस्तक प्रदर्शनामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पुस्तक प्रकाशन थांबवण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली होती; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाला डावलून १३ ऑगस्ट या दिवशी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.


Multi Language |Offline reading | PDF