गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन
राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा
अध्याय २ – सांख्ययोग

पू. अनंत आठवले

१. तत्त्वज्ञान

१ अ १. सांख्यशास्त्राची तत्त्वे

१ अ १ इ. सत्य चिरंतन असते !

विवेचन

उपनिषदांत सत्य हे ब्रह्माचे स्वरूप म्हटले आहे. ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मानन्दवल्ली, अनुवाक १), म्हणजे ‘ब्रह्म म्हणजे सत्य, ज्ञान आणि अनंतत्व.’ ‘आपण म्हणजे आत्मा’, हे नित्य सत्य आहे. जे खरोखर आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. ‘नासतो विद्यते भावो’, म्हणजे ‘जे नाशवान् आहे, ते असत्य आहे.’ जे चिरंतन असते, तेच सत्य असते.

१ अ १ ई. आत्मा अविकारी आहे !

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लो.क २३

अर्थ : या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी इत्यादी द्रव पदार्थ भिजवू शकत नाहीत आणि वारा वाळवू शकत नाही.

(क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’


Multi Language |Offline reading | PDF