लंडन येथे पाकिस्तान समर्थकांकडून होणारा भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान पत्रकार पूनम जोशी यांनी रोखला

अशा राष्ट्रभक्तांकडून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे काही शिकतील का ?

लंडन – १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थक यांंनी निदर्शने केली. या वेळी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवून अपमान केला. त्या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या एएन्आय वृत्तसंस्थेच्या भारतीय पत्रकार पूनम जोशी यांनी त्यांना विरोध केला.

(हा व्हिडियो दाखविण्यामागे लोकांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

पूनम जोशी यांनी पळत जाऊन राष्ट्रध्वज पायदळी तुडवणार्‍यांकडून तो खेचून घेतला, तसेच आणखी एक राष्ट्रध्वज उचलून आणला. या घटनेचा व्हिडिओ एएन्आयने ट्विटरवर प्रसारित केल्यावर भारतियांनी पूनम जोशी यांच्या देशभक्तीचे कौतुक केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF