चोरीला गेलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या २ प्राचीन मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत

  • अशा प्राचीन मूर्तींची चोरी होऊन त्या भारताबाहेर जातातच कशा ? भारताचा अमूल्य ठेवा असणार्‍या अशा प्राचीन मूर्तींची देखरेख करू न शकणारे पुरातत्व खाते विसर्जित करा !
  • अशा मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !

नवी देहली – काही वर्षांपूर्वी आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून चोरीला गेलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या २ प्राचीन मूर्ती इंग्लंडने भारताला परत केल्या आहेत. यांतील एक मूर्ती २ सहस्र वर्षे जुनी असून ती चुनखडीपासून बनवली आहे. दुसरी १७ व्या शतकातील आहे. ही मूर्ती कांस्य धातूची आहे. इंग्लंडने भारताच्या उच्चायुक्त रूची घनश्याम यांच्याकडे या मूर्ती सोपवल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटन यांच्या एका अन्वेषण पथकाने या दोन्ही मूर्तींचा शोध लावला. (अशा मूर्तींची चोरी होऊन त्या देशाबाहेर जातात, याचा अर्थ भारतीय यंत्रणा झोपा काढतात, असे समजायचे का ? – संपादक)

रूची घनश्याम म्हणाल्या की, या मूर्तींचे मूल्य ठरवता येणार नाही; कारण त्या अमूल्य आहेत. या कलाकृती भारतात परत येणे हे अमेरिका आणि ब्रिटन यांचे भारतासमवेत असलेल्या मैत्रीचे प्रतीक आहे.


Multi Language |Offline reading | PDF