दिवसाढवळ्या अत्याचार होत असतील, तर रात्री कामाहून येणार्‍या महिलांचे काय ? – शिवसेनेच्या महिला आघाडीचा अपर पोलीस अधीक्षकांना प्रश्‍न

नालासोपारा येथे दिवसाढवळ्या धर्मांधाने हिंदु युवतीला मारहाण केल्याचे प्रकरण

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – महिलांची सुरक्षा वार्‍यावर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दिवसाढवळ्या महिलांसमवेत असे प्रकार घडत असतील, तर दुपारी एकट्या-दुकट्या शाळेत येणार्‍या-जाणार्‍या कुमारवयीन विद्यार्थिनींचे काय ? रात्री विलंबाने कामाहून परत येणार्‍या महिलांचे काय ?, असे प्रश्‍न पालघर येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी वसईच्या अपर पोलीस अधीक्षकांना विचारले.

१. काही दिवसांपूर्वी नालासोपारा रेल्वेस्थानकावरून सकाळी कामावरून घरी जाणार्‍या हिंदु युवतीला फुरखान शेख या रिक्शाचालकाने मारहाण केली होती. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

२. या प्रकरणी महिलांच्या सुरक्षेविषयी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने वसईतील अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व रिक्शा थांबे आणि सार्वजनिक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याची, तसेच पोलीस चौकी उभारण्याची मागणी त्यांनी केली.

३. या निवेदनात म्हटले आहे की, नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रिक्शा चालकांविषयी मोठ्या प्रमाणात भीती आहे. विशेषकरून नालासोपारा पश्‍चिमेला अवैध रिक्शाचालकांची भीती अधिक आहे. रात्री येणार्‍या प्रवाशांना हत्यारे दाखवण्याचे प्रकारही येथे घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत या भागात पोलीस पहार्‍याची व्यवस्था करण्यात यावी.

४. हे निवेदन देतांना शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, शिवसेनेच्या पालघर जिल्हा संघटक सौ. किरण चेंदवणकर, तालुका संघटक सौ. प्रभा सुर्वे, उपजिल्हा संघटक सौ. मनाली चौधरी, नगरसेविका सौ. शिल्पा सिंग यांसह शिवसेनेच्या अन्य महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Multi Language |Offline reading | PDF