पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्ती आणा !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे हेच सांगत आहेत !

मुंबई, १७ ऑगस्ट (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरीस आणि कागद यांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्ती आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांनी केले.

या वेळी डॉ. यशवंत सोनटक्के पुढे म्हणाले, ‘‘काही वेळा मूर्तींना रंगवण्यासाठी उपयोगात आणलेले रंग रासायनिक असतात. रासायनिक रंगांमध्ये धातूचे अवशेष असतात. ते पाण्यात गेल्यामुळे जलचरांसाठी घातक असतात. जलचरांच्या माध्यमातून त्यातील विषारी रसायन मानवी शरिरापर्यंत पोचू शकते. यासाठी आपण दक्ष रहायला हवे. गणेशोत्सवात सजावट करतांना थर्माकॉल आणि प्लास्टिक यांचा उपयोग करण्याऐवजी नैसर्गिक सजावट करावी. यातून खर्‍या अर्थाने श्रद्धा जपली जाईल आणि पूजा-अर्चा पूर्णत्वाला जाण्याचा आनंद मिळेल.

या वेळी डॉ. यशवंत सोनटक्के म्हणाले, ‘‘कृत्रिम हौदांत मूर्तींचे विसर्जन केल्यास त्यामुळे नद्या आणि समुद्र यांमध्ये होणारे प्रदूषण रोखता येईल. (श्री गणेशचतुर्थीच्या काळात पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीमध्ये मोठ्या प्रमाणत गणेशतत्त्व येते. त्यामुळे पूजेकरता ठेवलेली मूर्ती वहात्या जलाशयात विसर्जित करावी, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे मूर्तीमधील पवित्रके पाण्याच्या माध्यमातून सर्वदूर पसरतात. त्याचा सर्वांनाच आध्यात्मिक लाभ होतो. श्री गणेशमूर्ती शाडूच्या माती आणि नैसर्गिक रंंगांनी रंगवलेली असेल, तर प्रदूषण होत नाही ! – संपादक) श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशतत्त्व येते. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तीसमवेतच धातूच्या मूर्ती असल्यास त्या वर्षानुवर्षे पूजेसाठी ठेवता येतात. (श्री गणेश चतुर्थीच्या वेळी श्री गणेशलहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात सर्वाधिक शक्ती येईल. अधिक शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात; म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज आणि तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी अधिक वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्तीला शक्य नसते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF