ख्रिस्ती शिक्षणसंस्था मुलांसाठी सुरक्षित नसल्याचे लोकांना वाटू लागले आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

ख्रिस्ती शाळांवर धर्मांतराचेही आरोप झाले आहेत !

लोकांना वाटते, ते आता उच्च न्यायालय सांगू लागले आहे, हे चांगले लक्षण आहे ! आता त्यापुढे जाऊन अशा घटना रोखण्यासाठीही न्यायालयाने प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !

चेन्नई – सर्वसामान्य लोकांना आणि पालकांना आता असे वाटू लागले आहे की, ख्रिस्ती शिक्षणसंस्था मुलांसाठी सुरक्षित नाहीत. यापूर्वी अशा संस्थांवर अन्य धर्मियांना ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप झाले आहेत, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस्. वैद्यनाथन् यांनी एका सुनावणीच्या वेळी केले. मद्रास ख्रिश्‍चियन कॉलेजचे साहाय्यक प्राध्यापक सॅमुअल टेनिसन यांच्यावर काही विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. ‘मैसूरू आणि बेंगळूरू येथील अभ्यास दौर्‍याच्या वेळी हे लैंगिक शोषण करण्यात आले होते’, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

महाविद्यालयाच्या अंतर्गत चौकशी समितीने केलेल्या चौकशीत हे आरोप सत्य असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर टेनिसन यांनी उच्च न्यायालयात त्याविरोधात याचिका प्रविष्ट केली आहे.

न्यायाधिशांनी या वेळी सरकारला आवाहन केले की, अनेकदा कायद्यांचा दुरुपयोग करण्यात आल्याचेही समोर येते. महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे बनवले आहेत, त्याचा अनेकदा वापर करून पुरुषांना लक्ष्य करण्यात येते.


Multi Language |Offline reading | PDF