एमआयएमच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे रेल्वेसेवा काही घंटे ठप्प

कलम ३७० रहित करणे, तोंडी तलाकविरोधी कायदा आदी कारणे सांगत एमआयएमच्या धर्मांध कार्यकर्त्यांकडून हिंसाचार

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांनी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बाधा आणणे आता नवीन राहिलेले नाही. आता ममता बॅनर्जी याविराधोत काही कृती करतील का, हाच प्रश्‍न आहे !

संग्रामपूर (दक्षिण २४ परगणा, बंगाल) – १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एम्आयएम् (मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन) या पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी संग्रामपूर रेल्वेस्थानक (पूर्व रेल्वे) भागात रेल्वेगाड्यांवर आक्रमण करत दगडफेक केली. यामुळे रेल्वेसेवा काही घंट्यांंसाठी बंद ठेवण्यात आली. ‘अल्ला-हु-अकबर’, असे ओरडत असलेल्या हिंसक जिहादी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरएएफची अतिरिक्त तुकडी तैनात केली होती. या घटनेचा एक व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. कलम ३७० रहित करणे, तोंडी तलाकविरोधी कायदा आणि मुसलमानांवरील (कथित) आक्रमणे यांना विरोध असल्याचे सांगत त्यांच्याकडून हा हिंसाचार करण्यात आला.

१. हिंसक जमावाने शस्त्रे घेऊन आणि घाणेरडी भाषा वापरून हिंदु प्रवाशांना घाबरवण्यासाठी रेल्वेच्या डब्यामध्ये प्रवेश केला. कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी आणि प्रवासी यांच्यावर त्यांनी आक्रमण केले.

२. बंगालमधील मुसलमानबहुल भागात एम्आयएम् झपाट्याने पसरत आहे. याचे कारण सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे राज्यातील जिहादी परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF