बकरी ईदच्या दिवशी नियम धाब्यावर बसवून मुंबईत अनेक ठिकाणी बकर्‍यांची कुर्बानी

पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश

मुंबई – बकरी ईदच्या दिवशी महानगरपालिकेने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बकर्‍यांची कुर्बानी देण्यात आली, असा आरोप करत  एका प्राणीमित्राने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर मुंबई महानगरपालिकेने देवनार पशूवधगृहाच्या बाहेर ८५० ठिकाणी कुर्बानीसाठी अनुमती देण्यात आली होती. नियमांचे पालन न करणार्‍या १९ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे, असे न्यायालयात सांगितले. याचिकाकर्त्याने मात्र पालिकेचे म्हणणे अमान्य करत अनेक ठिकाणी अवैधपणे कुर्बानी देण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. याविषयी नियम मोडणार्‍यांवर कोणती कारवाई केली, हे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पालिकेला दिला आहे. या विषयाची सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF