रांची (झारखंड) येथे रस्त्यावर नमाजपठण न करता मशिदीतच करण्याचा मुसलमानांचा निर्णय

इस्लामच्या विरोधात असल्याने निर्णय

  • रस्त्यावर नमाजपठण करणार नाही, हा लोकांवर उपकार नाही ! रस्त्यावर विनाअनुमती आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणे हा गुन्हा आहे. आतापर्यंत अशा लोकांवर कारवाई न केली जाणे हाही संबंधितांकडून झालेला गुन्हाच होता !
  • ‘रस्त्यावर नमाजपठण करणे, इस्लामच्या विरोधात आहे’, हे आतापर्यंत का लक्षात आले नाही आणि देशातील अन्य मुसलमानांना हे अजून का लक्षात येत नाही ?

रांची (झारखंड) – इतरांना त्रास देऊन रस्त्यावर नमाजपठण करणे इस्लामच्या विरोधात आहे. रस्त्यावरून शाळांच्या बसगाड्या, रुग्णवाहिका, अन्य महत्त्वाची वाहने जात असतात. त्यामुळे रस्त्यावर नमाजपठण करू नये, असे आम्ही मुसलमानांना सांगितले आहे. आता ते मशिदीच्या आतच नमाजपठण करतील. त्यांना तेथे जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे येथील ‘एकरा’ मशिदीचे मौलाना उबैदुल्लाह यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF