गीताज्ञानदर्शन

श्री. अनंत आठवले

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा

अध्याय २ – सांख्ययोग

१. तत्त्वज्ञान
१ अ १. सांख्यशास्त्राची तत्त्वे
१ अ १ आ. पुनर्जन्म होणे
   अ १ आ २. जीवात्म्याने नवे शरीर धारण करणे

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २२

अर्थ : ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रे टाकून मनुष्य दुसरी नवी वस्त्रेे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मे जीर्ण शरिरे सोडून नव्या शरिरात जातात.

१ अ १ इ.        सत्य चिरंतन असते !

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १६

अर्थ : असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव (ती नाहीच असे) नसतो. अशा प्रकारे या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.  (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’


Multi Language |Offline reading | PDF