१५ वर्षे वेतन न मिळाल्याने शिक्षकाची आत्महत्या !

गोंदिया – विनाअनुदानित शाळेमध्ये कार्यरत असलेल्या केशव गोबडे या शिक्षकाला १५ वर्षे वेतन न दिले गेल्याने अखेर त्याने १५ ऑगस्टला विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. एक ना एक दिवस शाळेला अनुदान मिळेल आणि आपले वेतन होईल, या आशेवर त्यांनी इतके वर्षे चाकरी केली. सहा वर्षांपूर्वी गोबडे यांची पत्नी आणि मुलेही त्यांना सोडून गेली होती. (शेतकर्‍यांप्रमाणे शिक्षकांचीही अशी स्थिती होत राहिली, तर देशाचे भवितव्य काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF