भारतीय न्यायपालिकेत अनुचित कृत्यांमध्ये वाढ ! – सरन्यायाधीश रंजन गोगोई

सोनारानेच कान टोचले, हे बरे झाले ! ‘आता अशी कृत्ये रोखण्यासाठीही सरन्यायाधिशांनी प्रयत्न करावेत’, असेच जनतेला वाटते !

नवी देहली – गेल्या काही काळापासून अनुचित कृत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे भारतीय न्यायपालिका पहाते आहे. अशा घटनांनी सर्वोच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये त्यांचे कुरूप डोके वर काढले आहे. ‘देशातील न्यायपालिकेचा शिष्टाचार आणि प्रतिष्ठा हरवू नये’, असा निश्‍चय सर्वांनीच केला पाहिजे, असे आवाहन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलतांना केले. ‘भारतातील न्यायालयांमध्ये लालित्यपूर्ण वक्तृत्व आणि चर्चा यांच्याऐवजी आता कर्कशपणा अन् ‘प्रेरित’ वर्तणूक वाढत चालल्याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली.

या वेळी कायदामंत्री रविशंकर प्रसाद, अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांच्यासह ज्येष्ठ अधिवक्ता उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF