भारत प्रथम अण्वस्त्र वापरणार नसला, तरी परिस्थितीनुसार या तत्त्वात पालट शक्य ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पोखरण (राजस्थान) – पोखरण (येथे भारताने प्रथम अणूचाचणी केली होती.) हे असे ठिकाण आहे, ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला ‘आण्विक शक्ती’ म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच या वेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ (प्रथम वापरणार नाही) हे तत्त्वही निश्‍चित केले. भारत या तत्त्वाचे पालन करत आहे; मात्र भविष्यात परिस्थितीनुसार या तत्त्वात पालट होऊ शकतो, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.


Multi Language |Offline reading | PDF