३७० कलम हटवल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांकडून जिहादची धमकी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्याविना या आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करता येणार नाही !

नवी देहली – हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी खालिद सैफुल्ला, नायब अमिर यांच्यासह अन्य आतंकवाद्यांनी १५ ऑगस्टला पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये प्रेस क्लबसमोर भारताच्या विरोधात आंदोलन केले. ‘कोणतीही कारवाई शब्दांपेक्षा अधिक काम करते. आम्ही जिहादसाठी सिद्ध आहोत’, असे सैफुल्ला या वेळी म्हणाला. याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

१. पाकिस्तानी अधिकारी हिजबुल मुजाहिदीन आणि ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’(यूजेसी) यांना भारताच्या विरोधात जिहाद पुकारण्यास प्रोत्साहित करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच या वेळी त्यांच्यासमवेत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाऊद्दीन हाही तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे.

२. दुसरीकडे आतंकवादी हाफीज सईद पुन्हा एकदा आतंकवादी कारवाया करण्याच्या सिद्धतेत आहे. त्याच्या ‘जमात-उल-दावा’वर काही दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. अशातच दुसर्‍या आतंकवादी संघटनांसमवेत हातमिळवणी करून तो कारवाया करण्याच्या सिद्धतेत आहे.


Multi Language |Offline reading | PDF