तिरुमला येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रसादरूपी लाडूमध्ये सापडली टाचणी !

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
  • आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यावर मंदिरांमध्ये असेच घडत रहाणार ! यापूर्वीही रेड्डी यांचे वडील वाय. सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रसादाचे कंत्राट ख्रिस्त्यांना देण्यात आले होते, हे विसरता येणार नाही !

नेल्लोर – तिरुमला येथील श्री बालाजी मंदिरात एका भक्ताने विकत घेतलेल्या प्रसादरूपी लाडूमध्ये टाचणी सापडल्याचे वृत्त आहे. रायचोटीजवळील देवगुडीपल्ली येथील भक्त श्री. शशांक रेड्डी यांनी त्यांच्या बंधूसह नुकतेच भगवान श्री बालाजीचे दर्शन घेतले होते. या वेळी त्यांनी प्रसाद म्हणून तेथील लाडू विकत घेतले होते. घरी पोचल्यानंतर प्रसाद ग्रहण करतांना लाडूमध्ये टाचणी असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले.

या घटनेविषयी माहिती मिळताच तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष व्हाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानचे विशेष अधिकारी धर्मा रेड्डी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिला. तसेच प्रसाद बनवतांना निष्काळजीपणे वागणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. (प्रसाद बनवण्याची सेवा भक्तांकडे सोपवली असती, तर त्यांनी ती ईश्‍वरी सेवा असल्याचा भाव ठेवून परिपूर्ण आणि बिनचूक केली असती; मात्र हिंदुद्वेषी सरकारच्या नियंत्रणात असलेल्या मंदिरात असे प्रकार घडले, तर त्यात नवल ते काय ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF