जम्मू-काश्मीरमध्ये १९ ऑगस्टपासून शाळा आणि महाविद्यालये उघडणार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. गेल्या २-३ दिवसांपासून काश्मीर येथील परिस्थिती सामान्य होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये १९ ऑगस्टपासून उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील इंटरनेट आणि दूरभाष सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. या सेवांवरील बंदीही हटवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी काश्मिरातील परिस्थिती पाहून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF