गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा

अध्याय २ – सांख्ययोग

१. तत्त्वज्ञान

१ अ १. सांख्यशास्त्राची तत्त्वे

१ अ १ आ. पुनर्जन्म होणे

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
     न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १२

अर्थ : ‘मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते’, असे नाही आणि यापुढे ‘आम्ही सर्व जण असणार नाही’, असेही नाही.

१ अ १ आ १. मरणार्‍याचा जन्म निश्‍चितच होणार !

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
     तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २७

अर्थ : जन्मास आलेल्याला मृत्यू निश्‍चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्‍चित आहे; म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’    


Multi Language |Offline reading | PDF