पालघर येथे बकरी ईदच्या दिवशी गोमाता आणि गोवंश यांची मोठ्या प्रमाणात अवैध हत्या

हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे आणि तथाकथित प्राणीमित्र संघटना बकरी ईदला होणार्‍या गोहत्यांविषयी गप्प का ?

  • धर्मांधांवर कारवाई न करता पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दडपशाही

  • हिंदुत्वनिष्ठांकडून पोलिसांत तक्रार

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात गोहत्या बंदी कायदा असतांना पालघर जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणात गोमाता आणि गोवंश यांच्या हत्या चालू आहेत. हे सर्व उघडपणे चालू असूनही धर्मांधांवर कारवाई न करता गोहत्या रोखण्यासाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवरच दडपशाही अवलंबण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोमाता आणि गोवंश यांच्या हत्याविषयी गोरक्षक पोलिसांना वेळोवेळी माहिती देत असूनही हे प्रकार थांबत नाहीत. (यात पोलीस धर्मांधांकडून पैसे घेऊन गुप्तपणे त्यांना सहकार्यच करत नसतील कशावरून ? अशा पोलिसांवर शासनाने कडक कारवाई करून राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्यावर खर्‍या अर्थाने कार्यवाही करावी ! – संपादक)

१२ ऑगस्टला बकरी ईदच्या निमित्त येथील चिंचणी भागांत अवैधरित्या गोमाता, तसेच गोवंश आणून त्यांंची हत्या करण्यात आली. या विरोधात बजरंग दलाचे पालघर जिल्हा संयोजक श्री. चरण सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८, भादंवि ४२९ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध गोवंशियांची हत्या न रोखता पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतले

बकरी ईदच्या दिवशी तेथील खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्या केलेल्या गोवंश आणि बकरे यांचे धडाचे शेष राहिलेले अवशेष टाकण्यात आले होते. तेथे काही धर्मांध खड्ड्यावर माती टाकत होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात याविषयी कळवले; पण घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई न करता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच पोलीस ठाण्यात आणले आणि तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना घेऊन आल्याचे कारण दिले.

पोलीस ठाण्यापासून १०० मीटरच्या अंतरावरील भागात अवैध गोवंश हत्या चालू

तारापूर आणि चिंचणी या भागात तबेल्यांच्या नावाखाली येथील मोहल्ल्यांमध्ये अवैध गोवंशियांच्या हत्या होत आहेत. २ आठवड्यांपूर्वीच चिंचणी भागांत गोवंशांची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. हे प्रकरणही पोलिसांनी दाबले. चिंचणी खाडीनाका भागात जेथे अवैधपणे गोवंशियांच्या हत्या होतात, तेथे १०० मीटर अंतरावर चिंचणी खाडीनाका पोलीस चौकी आहे. (पोलीस चौकीच्या काही अंतरावर होणार्‍या गोवंशियांच्या हत्या रोखता न येणारे पोलीस अन्य भागांतील गोहत्या रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार ? – संपादक)

बकरी ईदच्या आधी १५ दिवसांपासून कार्यकर्त्यांचा पहारा; मात्र पोलिसांचे दुर्लक्ष

बकरी ईदच्या कालावधीत होणार्‍या गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते पहारा देत होते. त्यामुळे काही प्रमाणात हे प्रकार थांबवण्यात यश आले; मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात येथे वरील प्रकार होतच आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे काम गोरक्षकांना करावे लागत आहे.

केवळ शांतता बैठका घेणारे पोलीस

बकरी ईदच्या दिवशी झालेल्या गोमाता आणि गोवंश हत्या यांच्या पार्श्‍वभूमीवर माणगाव पोलिसांनी १३ ऑगस्ट या दिवशी शांतता बैठक घेतली. त्यात पोलिसांनी हिंदू आणि मुसलमान दोघांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. बैठकीच्या वेळी उघडपणे चालू असलेल्या गोहत्या आणि पोलिसांकडून होत नसलेल्या कारवाईच्या निषेधार्थ संतप्त हिंदूंनी पोलीस ठाण्याच्या परिसरात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी २४ घंट्यांचा वेळ मागून घेतला. त्यानंतर पोलिसांनी गोवंशियांच्या अवशेषांवर माती टाकणारे जेसीबी चालक आणि अन्य दोघे यांना अटक केली. रात्री ३ वाजता पोलीस अधिकार्‍यांनी दूरभाष करून हिंदुत्वनिष्ठांना याची माहिती दिली. (हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तोंडदेखली कारवाई करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक)

धर्मांधांकडून बजरंग दलाचे जिल्हा संयोजक यांना पैसे देऊन गप्प करण्याचा प्रयत्न

१३ ऑगस्टला माणगाव पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीच्या वेळी एका धर्मांधाने गोहत्येविषयी गप्प रहावे, यासाठी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. चरण सिंह यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सिंह यांनी तुम्ही तुमच्या आईचा सौदा कराल का ? असे उत्तर देऊन धर्मांधाला खडसावले. (सडेतोड उत्तर देणारे चरण सिंह यांचे अभिनंदन ! – संपादक)

तबेल्याच्या नावाखाली चालू असलेली अवैध पशूवधगृहे पोलिसांनी बंद करावीत, अन्यथा आंदोलन उभारू ! – चरण सिंह, जिल्हा संयोजक, बजरंग दल, पालघर

तारापूर आणि चिंचणी येथे अवैध पशूवधगृहे चालू आहेत. या भागांत पोलीस ठाणे असूनही याविषयी त्यांना माहिती नसणे शक्यच नाही. धर्मांधांनी गायी कापायच्या आणि आपण केवळ शांतता बैठका चालू ठेवायच्या, हे आम्हाला मान्य नाही. तबेल्याच्या नावाखाली चालू असलेली अवैध पशूवधगृहे पोलिसांनी बंद करावीत, अन्यथा आम्ही आंदोलन उभारू !


Multi Language |Offline reading | PDF