गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या गीताज्ञानदर्शन ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा

१. तत्त्वज्ञान

१ अ १. सांख्यशास्त्राची तत्त्वे

१ अ १ अ. आत्म्याचे अमरत्व

१ अ १ अ १. जीवात्म्याची व्यक्ताव्यक्तता

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २८

अर्थ : हे अर्जुना, सर्व प्राणी म्हणजे जीवात्मे जन्मण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर अव्यक्त असतात. केवळ जीवनकाळात व्यक्त होतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा ?

१ अ १ अ २. आत्मा अवध्य असणे

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ३०

अर्थ : हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरिरात नेहमीच अवध्य असतो (मारला जाऊ शकत नाही); म्हणून सर्व प्राण्यांविषयी तू शोक करणे योग्य नाही.  (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ गीताज्ञानदर्शन  


Multi Language |Offline reading | PDF