गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या गीताज्ञानदर्शन ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा

१. तत्त्वज्ञान

गीतेत सांख्ययोगाची सांगितलेली तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत,

१ अ १. सांख्यशास्त्राची तत्त्वे

१ अ १ अ. आत्म्याचे अमरत्व

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्‍वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २०

अर्थ : आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा (इतर वस्तूंप्रमाणे) उत्पन्न होत नाही आणि असलेला (मरून) पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, शाश्‍वत आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले, तरी आत्मा मारला जात नाही.

स्पष्टीकरण : आत्मा अजन्मा आणि शाश्‍वत असून शरिराचा नाश झाल्यावरही याचा नाश होत नाही.              (क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ गीताज्ञानदर्शन   


Multi Language |Offline reading | PDF