सर्वांना कृतज्ञतेचा भाव अनुभवण्यास देणारी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांची भावाने ओथंबलेली चैतन्यस्वरूप वाणी !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अध्यात्माचे महत्त्व, गुरुदेवांनी अध्यात्म कृतीत आणायला शिकवून साधकांना अमृत कसे दिलेले आहे, यांविषयी सांगितले. गुरुमाऊली साधकाला कसे घडवत आहे, निरनिराळ्या गुणवैशिष्ट्यांनी कसे सजवत आहेत, तसेच असे असूनही साधकांविषयी कृतज्ञतेच्या भावाने तुम्ही जिंकलात, मी हरलो, असे म्हणणार्‍या थोर गुरुमाऊलींविषयी सांगितल्यावर सर्वांचाच भाव जागृत झाला. पू. ताईंच्या चैतन्यमय वाणीमुळे त्यांचे प्रत्येक सूत्र अंतर्मनापर्यंत जात होते. कार्यक्रमाचा लाभ आध्यात्मिक स्तरावर व्हावा, यासाठी महत्त्वाच्या प्रत्येक सूत्राच्या वेळी आर्ततेने प्रार्थना करायला सांगत होत्या, तसेच गुरुमाऊली किती भरभरून देत आहे, याविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यास सांगत होत्या. प्रार्थना आणि कृतज्ञता यांमुळे भाव जागृत होऊन सर्वांनाच कृतज्ञतेच्या भावात रहाता आले.


Multi Language |Offline reading | PDF