काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण पाकही भारताचा भाग ! – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध धर्मगुरु इमाम महंमद तौवहिदी

  • ऑस्ट्रेलियातील मुसलमान धर्मगुरूंना जे कळते, ते भारतातील धर्मांधांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना कळत नाही, असे कसे म्हणता येईल; मात्र स्वार्थासाठी ते याविषयी आंधळे, बहिरे आणि मुके होतात !
  • भारताची योग्य आणि सत्य स्थिती मांडल्याविषयी इमाम महंमद तौवहिदी यांचे कितीही अभिनंदन केले, तरी ते अल्पच !

नवी देहली – काश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि यापुढेही नसेल. पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचेच भाग आहेत. आताचे मुसलमान पूर्वी हिंदु धर्म सोडून इस्लाममध्ये आले असले, तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य पालटता येणार नाही. भारत हा पाकिस्तान आणि इस्लाम यांच्यापेक्षा जुना आहे, हे मान्य करायलाच हवे, अशी त्यांची परखड भूमिका ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुसलमान धर्मगुरु इमाम महंमद तौवहिदी यांनी भारताने कलम ३७० रहित करण्याच्या प्रकरणाविषयी ट्वीट करून मांडली.

१. तौवहिदी यांनी ट्वीट करून ही भूमिका मांडतांना पुढे म्हटले की, राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. पंतप्रधान मोदी यांना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूंना साथ देतात. गाझापट्टीमधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. हे दोघेही स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेर्‍यासमोर येऊन रडतात.

२. इमाम तौवहिदी यांनी यापूर्वीही जिहादी आतंकवादावरून पाकवर टीका केलेली आहे.

ऑप इंडिया या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानने त्यांच्या राज्यघटनेमध्ये देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याविषयी नमूद केले आहे; मात्र तेथील सरकारचे अल्पसंख्य समुदायाकडे दुर्लक्ष होतांना दिसते. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा स्वर्ग झाला आहे. ते आतंकवादाला खतपाणी घालतांना दिसतात. पाकिस्तान आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी पाश्‍चात्त्य देशांकडून लाखो डॉलर्सचे साहाय्य घेतो; मात्र त्यामधून तो कोणत्याही कट्टरपंथी गटांवर कारवाई करतांना दिसत नाही.

३. काश्मीरविषयी ते म्हणाले होेते की, माझ्या मते काश्मीरप्रश्‍नात काहीच पालट झालेला नाही. काश्मीर ही हिंदूंची भूमी असून तो पाकिस्तानचा भाग नाही. याविषयी मी माझ्या भारतभेटीच्या वेळी तेथील नेत्यांशी आणि धर्मगुरूंशी चर्चा केली होती.


Multi Language |Offline reading | PDF