सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणार्‍या लिखाणाच्या संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी आपली माहिती पाठवावी !

संकलन सेवा शिकण्याची आवड असलेल्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

सनातन प्रभातमध्ये विविधांगी विषयांवरील लिखाण प्रसिद्ध होते. संत, साधक, वाचक, तसेच धर्मप्रेमी यांचे लिखाण येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सनातन प्रभातमध्ये लिखाण प्रसिद्ध करण्यापूर्वी जी प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी साधकांची संख्या अत्यल्प पडत आहे. त्यामुळे या संबंधित काही सेवा प्रलंबित राहिल्या असून विविध विषयांवरील ४ सहस्र ७०० हून अधिक धारिकांचे (प्रथम प्राधान्य असलेल्या) संकलन करणे शेष आहे. या व्यतिरिक्त द्वितीय प्राधान्याच्या ७ सहस्र ३०० हून अधिक धारिकांचे प्राथमिक संकलन आणि १० सहस्रांहून अधिक धारिकांचे अंतिम संकलन करणे बाकी आहे.

जे साधक घरी राहून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ संकलन सेवा करण्यास इच्छुक आहेत, तसेच जे साधक प्रसारात सेवा करतात आणि इतर वेळी संकलन सेवा करू शकतात, त्यांनी स्वत:ची माहिती पुढील पत्त्यावर पाठवावी. ही सेवा करण्यासाठी मराठी भाषेचे साधारण ज्ञान असणे आवश्यक आहे. इच्छुक साधकांना मराठी भाषेतील व्याकरणाचे नियम आणि सनातनची संकलनाची संगणकीय पद्धत शिकवण्यात येईल. सेवा शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात न्यूतनम १५ ते २० दिवस येऊन रहाणे अपेक्षित आहे. त्यानंतर साधकांना घरी राहूनही ही सेवा करता येईल.

संकलनासाठी असलेले लिखाणाचे विषय

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील लिखाण

२. आश्रमात होणारे यज्ञ

३. बालसाधकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये

४. साधकांचे वाढदिवस किंवा त्यांच्या विवाहानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगणारे लेख

५. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणार्‍या साधकांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांचा साधनाप्रवास

६. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत येणार्‍या शिबिरार्थींचे मनोगत

७. रामनाथी आश्रम भेटीविषयी दर्शनार्थींचे अभिप्राय, तसेच आश्रम भेटीत साधकांना आलेल्या अनुभूती

८. संगीत आणि नृत्य या विषयांवरील लेख

९. आरोग्य साहाय्य समितीचे लेख

१०. विदेशातील साधकांच्या अनुभूती

११. राष्ट्र आणि धर्म यांविषयी तात्कालिक स्थितीनुसार येणारे विविध विषयांवरील लिखाण

१२. तत्कालीन कार्यक्रम, उदा. गुरुपादुका सोहळा, गुरुशक्ति-प्रदान सोहळा यांविषयीच्या अनुभूती

१३. आश्रमात होणारे यज्ञ आणि त्या संदर्भातील सूक्ष्म परीक्षणे, तसेच अनुभूती

१४. हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांची भाषणे

१५. संतांचे लिखाण आणि साधनाप्रवास

१६. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी दौर्‍याविषयीचे लेख

१७. साधकांना आलेल्या अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे

१८. साधकांना भावसत्संगात आलेल्या अनुभूती, साधक आणि बालसाधक यांनी केलेल्या कविता, तसेच त्यांनी काढलेली चित्रे इत्यादी

संकलन सेवेची व्याप्ती

१. लिखाणातील अनावश्यक भाग काढणे

२. व्याकरण सुधारणे

३. परिच्छेद करून मथळे देणे

४. आवश्यकता असल्यास शिरोभाग लिहिणे

संकलनाची सेवा श्रीलिपी या प्रणालीमध्ये केली जाते. ज्यांना मॉड्युलर लिपीत मराठी टंकलेखन येत नसेल, ते काही दिवस घरी टंकलेखनाचा सराव करू शकतात. सराव झाल्यावर ते रामनाथी आश्रमात येऊन संकलनाची सेवा शिकू शकतात.

संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा खालील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१.

साधकांनी पाठवावयाची माहिती

१. पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वय आणि शिक्षण

२. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कोणत्या माध्यमातून (मराठी / इंग्रजी / हिंदी इत्यादी) झाले आहे ?

३. घरी संगणक आहे का ? ई-मेलची व्यवस्था आहे का ? असल्यास ई-मेलचा पत्ता

४. मराठी टंकलेखन येते का ? असल्यास कोणत्या प्रणालीमध्ये ? (उदा. ए.पी.एस्., श्रीलिपी, आकृती इत्यादी)

५. संकलनाच्या सेवेचा काही अनुभव आहे का ?

सनातन प्रभातप्रमाणेच ग्रंथ, कला आणि ध्वनीचित्रीकरण या संबंधित सेवांमध्येही संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांसाठी सेवा उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार साधक सेवेची निवड करू शकतो.  


Multi Language |Offline reading | PDF