विक्रम भावे यांच्या जामीन आवेदनावरील आदेश १७ ऑगस्टला देण्यात येणार

माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे

पुणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आलेले माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या जामीन आवेदनावरील आदेश १७ ऑगस्ट या दिवशी देण्यात येणार आहे, असा निर्णय पुणे येथील न्यायालयाने दिला. १३ ऑगस्ट या दिवशी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता सूर्यवंशी यांनी काम पाहिले, तर आरोपी पक्षाचे अधिवक्ता म्हणून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी युक्तीवाद करत श्री. विक्रम भावे यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने युक्तीवाद ऐकून पुढील सुनावणीसाठी हा निर्णय दिला.


Multi Language |Offline reading | PDF