पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या कार्यकर्त्यांना सैनिकांचा सलाम करून श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कौतुक !

सांगली – सांगलीत जगभरातून साहाय्य येत असतांना मात्र श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संघटनेचे पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) कुठे आहेत ? असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सामाजिक संकेतस्थळावर उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला सैन्य दलाच्या एका तुकडीतील सैनिकांनी सलाम (सॅल्यूट) करून उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान ही संघटना अतिशय मजबूत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा सॅल्यूट आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे हिंदुद्वेषी आणि बुद्धीप्रामाण्यवादी तोंडघशी पडले आहेत.

१. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यकर्ते सचिन मोहिते यांनी आमची रहाण्याची आणि खाण्याची सोय पाहिली. आम्हाला त्यानेच साहाय्य केले. संघटनेच्या अनेक मित्रांनी आम्हाला साहाय्य केले. मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दांत सैन्य दलाच्या एका तुकडीतील सैनिकाने कौतुक केले आहे.

२. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा दुपटीने काम केले. तुमची आणि आमची अशीच एकता राहिली, तर आम्ही कुठेही काम फत्ते करू शकतो, असे म्हणत सैन्यातील सैनिकाने कार्यकर्त्यांना सलाम केला.

३. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना अनेकांनी ट्विटरवर म्हटले आहे, पू. भिडे (गुरुजी) महापुराच्या काळात पहिल्या दिवसांपासून कामात मग्न होते. ११ ऑगस्टला पू. भिडे (गुरुजी) यांच्या एका कार्यक्रमाचे पत्रक सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते. त्यावरूनही ते ३२ मण सोन्याच्या सिंहासनासाठी मग्न असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करण्यात येत होती; मात्र टीकेलाही अनेकांनी पू. भिडे (गुरुजी) यांच्या पूरभागातील साहाय्यकार्याचे छायाचित्र पोस्ट करून उत्तर दिले.


Multi Language |Offline reading | PDF