पूरपट्ट्यातील घरांना अनुमती देणार्‍यांवर कारवाई करणार ! – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जलसंपदामंत्री गिरीश महाजन

सांगली – केवळ सांगली शहरातच नव्हे, तर संपूर्ण देशभरातच पूर नियंत्रण रेषेच्या आत घरे बांधण्यात येत आहेत. याला अनुमतीही देण्यात येत आहे. पुरासारखी भयंकर परिस्थिती आल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते. पूर नियंत्रण रेषेत घरांच्या बांधकामांना अनुमती देणे, ही गोष्ट गंभीर असून पूरपट्ट्यात घरांना अनुमती देणारे अधिकारी आणि बांधकाम करणार्‍या वास्तूविशारदांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी १२ ऑगस्टला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, महापालिकेच्या आयुक्तांचा बंगला पूरपट्ट्यात येत असेल, तर याचीही चौकशी करण्यात येईल.

पूर ओसरल्यानंतर चौकशी समिती स्थापन करावी. पूरस्थितीला उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. अधिकार्‍यांवर कारवाई होईल, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF