रशियामध्ये सैन्य चाचणीच्या वेळी झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू

मॉस्को – उत्तर रशियात सैन्याच्या चाचणी तळाजवळ एका रॉकेट इंजिनचा स्फोट झाला. त्यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण घायाळ झाले आहेत, अशी  माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली; मात्र याविषयी सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ‘स्फोटानंतर घातक रसायने वातावरणात मिसळलेली नसून किरणोत्सर्गाच्या पातळीमध्येही पालट झालेला नाही’, असा दावा त्यांनी केला.

तथापि या स्फोटानंतर किरणोत्सर्गाचा प्रभाव न्यून करण्यासाठी येथील सेवेरोड्विंन्स्क आणि अर्खन्गेस्क या २ शहरांतील नागरिकांनी घरात आयोडिनचा साठा करणे चालू केले आहे. किरणोत्सर्गाचा प्रभाव न्यून करण्यासाठी आयोडिनचा वापर केला जातो. अचानक वाढलेल्या मागणीमुळे या शहरांतील औषधांच्या दुकानांतील आयोडिनचा साठा संपला आहे. सेवेरोड्विंन्स्क शहरातील अधिकार्‍यांनी किरोणीत्सर्गाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या शहरात अण्वस्त्र पाणबुडयांची निर्मिती केली जाते.


Multi Language |Offline reading | PDF