पाककडून आता देहली-लाहोर बससेवा बंद !

भारतातील प्रखर राष्ट्राभिमानी ज्याला विरोध करत होते, ती बस सेवा पाकने स्वतःहून बंद केल्याने राष्ट्राभिमान्यांना आनंदच झाला आहे, हे वेगळे सांगायला नको !

इस्लामाबाद – भारताने कलम ३७० रहित केल्यानंतर जळफळाट झालेला पाकिस्तान प्रतिदिन नवनवीन निर्णय घेऊन भारताच्या विरोधात स्वतःचा राग प्रगट करत आहे. पाकने प्रथम समझौता एक्सप्रेस आणि नंतर थार एक्सप्रेस थांबवली. आता त्याने देहली-लाहोर बससेवाही बंद केली आहे. यापूर्वी पाकने भारतासमवेतचा व्यापार बंद केला होता आणि भारतीय चित्रपटांना पाकमध्ये प्रदर्शित करण्यावर बंदी घातली होती.


Multi Language |Offline reading | PDF